कोपर खैरने पोलिसांनी फायरिंग करणाऱ्या इसमाला केले जेरबंद..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
नवी मुंबई – पिस्टल मधून एक राउंड फायरिंग करणाऱ्या एका इसमास कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, कोपरखैरणे येथील सेक्टर १९, मधील जिमी टॉवर याठिकाणी फिर्यादी हे त्यांची टुरिस्ट कार घेऊन थांबले असताना एका इसमाने स्कुटीने फिर्यादी यांच्या कारला पाठीमागून धडक दिल्याने फिर्यादी सदर इसमासोबत बोलत असताना सदर इसमाने त्याच्याजवळ असलेल्या पिस्टल मधून एक राउंड जमिनीवर फायर केला असल्याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कोपर खैरने पोलिसांनी तपास करून सदर इसमास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल, ४ जिवंत राउंड, वाहन, हेल्मेट, कपडे पोलिसांनी हस्तगत केले आहेत व पुढील तपास सुरू आहे.



0 Comments