एकतेची प्रतिज्ञा

 एकतेची प्रतिज्ञा 🤝  



         नरडवे माझा गाव आहे. गावातील सारे लोक माझे बांधव आहेत. मी एक नरडवे गावचा त्रस्त धरणग्रस्त आहे. माझ्या गावावर माझे जिवापाड प्रेम आहे. माझ्या गावातल्या प्रेमळ स्वभावाच्या आई-वडील, बंधू-भगिनी  काका-काकी, आजी-आजोबा यांचे भले करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी यावे म्हणून मी ब्राह्मणदेव आणि अंबादेवी यांच्या कडे सदैव प्रार्थना करीन.

         माझ्या गावातल्या आणि बाजुच्या सोनवडे गावातील दुर्गानगर येथील माझ्या सर्व आप्तस्वकियांचे हित कसे साध्य होईल, याचा मी प्रयत्न करीन.

       माझ्या गावातल्या शेती, झाडे विविध फळाफुलांनी व समृध्दतेने नटलेल्या आणि धार्मिक परंपरेचा वारसा असलेल्या या गावाचे रक्षण करण्याचे आम्ही मनापासून प्रयत्न करीत होतो. पण आज या घडीला धरणप्रकल्प होत असल्याने, आम्ही बेघर होणार याची आम्हाला खंत आहे. कारण 20 वर्षे व्हायला आली तरी अद्याप शासनाने योग्य पुनर्वसन आणि शेतजमिनी देण्याचे टाळलेले आहे. आणि म्हणून ते हक्काचे  मिळविण्याकरिता एका तनामनाने  प्रयत्नशील राहू.

        माझ्या गावातील गावबांधवांना एकत्रीत सर्वांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण  मिळून प्रयत्न करू. अन्यायाविरुद्ध एकजूट करू. माझा गाव आणि माझ्या गावातील माझे गावबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याचे व त्यांच्याशी  सौजन्याने वागण्याचे आणि त्यांच्या ह्क्काचे मिळवून देण्यासाठी प्रतिज्ञा करीत आहोत.  स्वत:च्या स्वार्थाकरिता इतरांचे नुकसान करणार नाही, अशी मी आणि माझे गावबांधव मिळून आम्ही शपथ घेत आहोत.


 लेखक,कवी : हरिसंतोष गोपाळ सावंत  (दि. १२/११/२०१९) 

8779172824 / 9324389918

Post a Comment

0 Comments